फराटे पाटील शैक्षणिक संस्थेचे कार्य कौतुकास्पद :माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील

मांडवगण फराटा(राजेंद्र बहिरट): दिवसेंदिवस शिक्षणाच्या पद्धती बदलत असुन त्या दृष्टीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणे गरजेचे आहे.श्री वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातुन जी नवीन पिढीसाठी शिक्षण दिले जात आहे ते काम कौतुकास्पद असल्याचे मत माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी व्यक्त केले.

मांडवगण फराटा(ता.शिरुर) येथील श्री वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हनुन ते बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले कि,पुर्वी ग्रामीण भागात शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नसायच्या. त्यामुळे अनेक तरुण तरुणी शिक्षणापासुन वंचित राहायचे.त्यामुळे आधीच्या पिढीचे मोठे नुकसान झाले आहे.सध्या सर्वञ दर्जेदार शिक्षण उपलब्ध असते.त्याचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक होणे गरजेचे आहे.संस्थेचे अध्यक्ष राजीव फराटे पाटील यांनी शिक्षणासाठी जो वटवृक्ष उभा केला आहे.त्यांचे ते प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढत संस्थेच्या कामाचे कौतुक केले.

यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव फराटे पाटील म्हणाले कि,ग्रामीण भागात शिक्षणाच्या सोयी सुविधा निर्माण करत असताना पुणे, मुंबई प्रमाणे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे हा हेतु नेहमी असतो.सध्या व्यावसयिक प्रशिक्षण,वैद्यकिय शिक्षण आदी शिक्षण मिळणे हे देखिल गरजेचे असुन त्यादृष्टीने संस्था कार्यरत आहे.सध्या हजारो विद्यार्थी संस्थेत ज्ञानार्जन करत असुन यातुन मिळणारे समाधान मोठे असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी कोहिनुर ग्रुपचे सीएम.डी डॉ.टी.एम.देशमुख,आयएफएस अधिकारी अक्षय वाले यांसह संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर फराटे पाटील,सचिव मृणाल फराटे पाटील,संस्थेचे विश्वस्त संग्रामराजे धावडे पाटील,उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष दिगांबर दुर्गाडे,शिरूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे,उपनिरीक्षक शुभम चव्हाण,सर्व पोलीस अंमलदार,विकास खळदकर,शिरुर बाजारसमीतीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे,बालाजी शिक्षण संस्थेचे प्रमुख सदाशिव पवार,जिल्हा दुध संघाच्या संचालिका केशरताई पवार,दादा पाटील फराटे,लक्ष्मण फराटे,जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल पाचर्णे,सरपंच समिक्षा फराटे,बाबासाहेब फराटे,एकनाथ शेलार,विश्वासकाका ढमढेरे,उर्जा उद्योगसमुहाचे प्रमुख प्रकाश कुतवळ, जिजामाता सहकारी बँकेचे संचालक संग्राम गायकवाड,हेमंत शेलार,शरद ढमढेरे मच्छिंद्र गदादे,शिवाजी मचाले, डॉ.अखिलेश राजुरकर,डॉ.धनंजय शिंदे,केशव फराटे,मिनाक्षी फराटे,माउली अण्णा ताकवणे,अशोक जगताप,आदी उपस्थित होते.दरम्यान संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त नामदार श्री शरदचंद्र पवार पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले.तसेच फराटे पाटील आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या वतीने मांडवगण,गणेगाव दुमाला,तांदळी,इनामगाव या केंद्रशाळांतर्गत असलेल्या ३२ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!