भव्य शक्तिप्रदर्शन करत माऊली कटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल

शिरूर : शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करीत ढोल ताशाच्या गजरात व गगनभेदी घोषणा देत उमेदवारी अर्ज दाखल केला.

शिरूर विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर कोणाला महायुतीच्या वतीने उमेदवारी जाहीर होणार याबाबत उत्सुकता होती.माऊली कटके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मंगळवार दि.२९ रोजी अर्ज दाखल करण्याचे निश्चित केले होते.सकाळी कटके यांनी वाघोली येथे श्रीवाघेश्वराचे दर्शन घेतले.वाघोली येथे कार्यकर्त्यांनी रॅलीचे आयोजन केले होते. शिरूर येथे आल्यानंतर शिरूर बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून भव्य रॅली काढली होती.या रॅलीला मोठा उत्साह मतदार व सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दाखवला. शिरूर बाजार समिती आवारातून निघालेली रॅली शिरूर पाच कंदील चौक येथे जाहीर सभेमध्ये परिवर्तित झाली. याच वेळी मोजक्या कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांनी शिरूर तहसील कार्यालय येथे उमेदवार अर्ज दाखल केला.

यावेळी म्हाडाचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीप वळसे पाटील,माजी आमदार पोपटराव गावडे,दादा पाटील फराटे,सुधीर फराटे इनामदार,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मोनिका हरगुडे, बाजारसमिती सभापती शशिकांत दसगुडे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे,शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे,स्वप्नील गायकवाड,यांसह सर्व पक्षाचे पदाधिकारी,शिरूर हवेलीतील महायुतीचे घटक पक्ष,महिला,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेसाठी अभूतपूर्व गर्दी जमल्याने शहरात दोन्ही बाजूने गर्दीच गर्दी झाली.सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते.

दरम्यान शिरूर हवेलीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत असून ही लढत तुल्यबळ होणार असल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!