शिरूर : शिरूर तालुक्यात कार्यसम्राट असे म्हणणाऱ्या आमदारांना त्यांच्या जिल्हा परिषद गटात रस्त्यांचा विकास करता आला नाही.अनेक रस्ते खोदून ठेवले आहेत ते कधी पूर्ण करणार असा सवाल सुधीर फराटे इनामदार यांनी केला आहे.
शिरूर तालुक्यात वडगांव रासाई येथे देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा होत असल्याने वडगांव रासाई ते मांडवगण फराटा दरम्यान रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे.याबाबत त्यांनी थेट शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्यावर टीका केली आहे.
याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की,शिरूर तालुक्यात गेल्या पाच वर्षांत कोणताही मोठा विकास झाला नाही.अनेक रस्ते त्यांच्या गावात करता आले नाही.निवडणुकीपूर्वी त्यांच्या गावात रस्त्यांच्या कामाची भूमिपूजन केले मात्र ते रस्ते गेले अनेक वर्षांपासून त्यांना का दिसले नाही.त्यांना मंत्रिपदाची स्वप्ने पडत आहे मात्र स्वतःच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य असताना जिल्हा परिषद गटात देखील रस्त्यांची दुरवस्था आहे.
शिरसगाव काटा ते मांडवगण फराटा हा रस्ता विकासाच्या नावाखाली अनेक ठिकाणी खोदून ठेवला आहे मात्र तो अपूर्ण आहे.रस्त्यावर आता कुणीही जाऊन पाहिलं तरी खडी उखडून आली आहे.नवीन खडीचे ठिकठिकाणी ढीग लावले आहे मात्र काम कुठेच पूर्ण झाले नाही.दररोज रस्त्याने जाताना अनेकांना अडचणी येतात.शाळकरी मुलांचे हाल होतात.तसेच इतर भागात ही रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे.केवळ विकासाचा फार्स केला आहे.जे अर्धवट रस्ते आहेत ते रस्ते कधी पूर्ण होणार असा सवाल ग्रामस्थ करत आहे.
कार्यसम्राट म्हणणाऱ्यांनी रस्ते जर पूर्ण केले असते तर आज पवार साहेब येणार म्हणून खड्डे बुजवण्याचे जे काम सुरू आहे ते करावे लागले नसते अशी टीका सुधीर फराटे इनामदार यांनी केली आहे.