घोडगंगा कारखाना वाचवण्यासाठी सभासदांनी किसान क्रांतीला बळ द्या : राहुल पाचर्णे

शिरूर (विशेष प्रतिनिधी) : घोडगंगा सहकारी साखर कारखाना अडचणीत असताना बारा वर्षांपूर्वी स्व.आमदार बाबुराव पाचर्णे यांनी पदयात्रा काढली.आमचे वडील सातत्याने घोडगंगा सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे हे सांगत होते तेव्हा ही सत्ताधारी जनतेची दिशाभूल करण्यात व्यस्त होते.आता कारखाना बंद पडला, त्यामुळे ऊस उत्पादक सभासदाचे हजारो शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.अनेकांचे संसार उघड्यावर आले मात्र तरीही सत्ताधारी त्याच तालावर आहेत. ऊस उत्पादक सभासदानी जर या ही वेळेस लक्ष दिले नाही तर कारखाना वाचवण्यासाठी आज जे धाडस करत आहेत.तेवढे मोठे धाडस कुणीही करणार नाही.त्यामुळे शेतकरी टिकवण्यासाठी अन् कारखाना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी किसान क्रांतीच्या या लढ्याला पाठबळ द्यावे असे आवाहन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे यांनी व्यक्त केले.

तर्डोबाचीवाडी (ता.शिरूर) येथे किसान क्रांतीच्या पायी दौऱ्याचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी झालेल्या सभेत पाचर्णे हे बोलत होते.

यावेळी बोलताना राहुल पाचर्णे म्हणाले की,आमचे वडील स्व.बाबुराव पाचर्णे यांनी हयातभर संघर्ष केला.जनतेच्या प्रश्नांसाठी लढत राहिले.कारखाना वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.१२ वर्षांपूर्वी पदयात्रा काढून जनतेला वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. ज्या वेळी कारखाना अडचणीत होता तेव्हा कर्जाची आकडेवारी सांगून जनतेला धोका स्पष्ट केला होता.सत्ता ज्यांच्या ताब्यात होती.त्यांनी मात्र तालुक्यातील जनतेला दिशाभूल करून आम्हीच कारखाना चालवू शकतो असे सांगितले होते मात्र आता कारखाना बंद पडला आहे.आता तरी ते मान्य करून त्यांनी जनतेला खरं काय ते सांगावे.लोकांना वेड्यात काढू नये अशी टीका पाचर्णे यांनी केली.

यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे म्हणाले की,जे सतत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करतात त्यांना अजित पवार यांनी सातत्याने मदत केली.तालुक्यात त्यामुळे मोठ्याप्रमाणावर विकास होत गेला.ज्यांनी तुम्हाला मोठे केले त्यांनाच तुम्ही बदनाम करता तालुक्यात खुनशी राजकारण करता.आता संस्था बंद पाडून नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्या नाही तर कारखाना कधी सुरू करणार हे जनतेला सांगावे अशी टीका काळे यांनी केली.
दरम्यान चौथ्या दिवशी (दि.२५) रोजी सकाळी चव्हाणवाडी येथून पदयात्रेला सुरुवात झाल्यानंतर गोलेगाव, तर्डोबाचीवाडी,शिरूर शहर अशी पार पडली.

यावेळी तर्डोबाची वाडीचे सरपंच जगदीश पाचर्णे,श्रीगोंदा कारखान्याचे संचालक श्रीनिवास घाडगे,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्ष व ग्रा.प.सदस्य तज्ञिका कर्डिले,अनिल बांडे,प्रमोद दंडवते ,राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष शरद कालेवार, बाजारसमितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, दूधसंघाचे संचालक स्वप्नील ढमढेरे,शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे,कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे, बाजार समितीचे संचालक संतोष मोरे,कैलास सोनवणे,दिलीप हिंगे,भाजपचे ज्येष्ठ नेते भगवान शेळके,रामभाऊ कदम,
मांडवगणचे उपसरपंच पांडुरंग मोरे,अशोक जगताप, बिभीषण फराटे , राष्ट्रवादी शहराध्यक्ष श्रुतिका झांबरे,पूनम मुत्त्याल,सुवर्णा सोनवणे,रुपाली कोठारी,मनीषा गव्हाणे,रुपाली पवार,सोनाली रायभोळे, अर्चना चकोर, भाग्यश्री चोथे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!