गौरी शुगरच्या वतीने शेतक-यांना मोफत साखर वाटप

मांडवगण फराटा(राजेंद्र बहिरट) : गौरी शुगरच्या वतीने आगामी गाळप हंगामात जर शिरुर तालुक्यातील शेतक-यांच्या उसतोडीसंदर्भात अडचणी आल्यास त्या सोडविण्यास प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांनी शेतक-यांना दिले.

मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथे गौरी शुगर अॅंड डिस्टलरीज प्रा.लि.युनिट ४ या साखर कारखान्याच्या वतीने कारखाना कार्यक्षेञातील शेतक-यांसाठी मोफत साखर वाटपाचा शुभारंभ बाबुराव बोञे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी त्यांनी उपस्थित शेतक-यांशी संवाद साधला.यावेळी घोडगंगाचे माजी उपाध्यक्ष गोविंदराजे निंबाळकर,श्रीगोंदा कारखान्याचे माजी संचालक विजयसिंह मोकाशी,भाउसाहेब जाधव,बाळासाहेब फराटे,चौरंगनाथ जगताप,लक्ष्मणबापु फराटे,दत्ताञय गदादे,दशरथ रणदिवे,प्रमोद गरुड आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले गळित हंगाम २०२३-२४ मध्ये उस गाळपास दिलेल्या सर्व शेतक-यांना या दिवाळीसाठी शेतक-यांची दिवाळी गोड करण्याच्या हेतुने मोफत साखर वाटप केले जात असुन १ ते ३० मे.टन उस गळित देणा-यास १० किलो,३१ ते ५० मे.टन देणा-यास २० किलो,५१ ते १०० मे.टन नुसार ३० किलो,१०१ ते १५१ मे.टन नुसार ४० किलो,१५१ ते २०० मे.टन नुसार ५० किलो,२०१ ते ३०० मे.टन नुसार ७० किलो व ३०० मे.टन व अधिक उस गळिपासाठी देणा-या शेतक-यांना १०० किलो अशा पद्धतीने साखर दिली जात आहे.आगामी गळित हंगाम मांडवगण फराटा व कार्यक्षेञातील उसतोडी संदर्भात जर शेतक-यांना अडचणी आल्या तर त्या सोडविण्यात प्राधान्य दिले जाईल.कोणाचेही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल.आगामी हंगामातही शेतक-यांनी अधिकाधिक उस गाळपास द्यावा असे आवाहन ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांनी केले आहे.

दरम्यान शिरुर तालुक्यात नव्हे तर राज्यात प्रथमच शेतक-यांना मोफत साखर वाटप करणारा साखर कारखाना म्हणुन गौरी शुगरचे कौतुक केले जात आहे.यावेळी एकनाथ शेलार,तेजमल कोरेकर,अशोक ढवळे,नवनाथ गायकवाड,अमोल होळकर,कारखान्याचे जनरल मॅनेजर रोहिदास यादव,शेतकी अधिकारी नवनाथ देवकर,विकास क्षिरसागर,सुनिल साठे,शशिकांत चकोर,दिलिप फराटे,समीर जकाते आदी उपस्थित होते.ज्ञानेश्वर जगताप यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!