मांडवगण फराटा(विशेष प्रतिनीधी) : ठिकठिकाणी फुलांच्या पायघड्या…बैलगाडीवर स्वागत…अन प्रचंड थंडी असुनही राञीच्या साडे अकरा वाजता ही महिला व युवकांच्या गर्दीचा उच्चांक असे चिञ शिरूर हवेलीत माउली कटकेंच्या गावभेट दौ-यात दिसुन येत असुन यामुळे शिरूर हवेलीत संपूर्ण मतदारसंघ “माऊली”मय झाल्याचे पाहायला मिळत आहे.अशा प्रकारचा उत्साह गेल्या पंचवीस वर्षांत कधीही पाहिला नाही असे अनेक ज्येष्ठ व्यक्ती सांगत आहे.
शिरूर हवेलीत सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून माऊली कटके हे महायुती चे उमेदवार म्हणून उभे आहेत.तर महाविकास आघाडी चे उमेदवार अशोक पवार यांच्यात समोरासमोर लढत होत आहे.
ज्ञानेश्वर कटके यांचा पूर्व भागात नुकताच गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता.या दौऱ्याची सुरुवात वडगांव रासाई येथून करण्यात आली.यानंतर नागरगाव येथे बैलगाडीत भव्य स्वागत करण्यात आले.”चला हवा येऊ द्या” फेम अभिनेते भाऊ कदम यांनी अचानक हजेरी लावत नागरिकांशी संवाद साधला.यावेळी कटके यांना त्यांनी शुभेच्छा देत “यंदा मतदारसंघात तुमचीच हवा” असे म्हणत मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
दरम्यान आंधळगाव,कोळगाव, निर्वी, शिरसगाव काटा, पिंपळसूटी, इनामगाव, तांदळी, गणेगाव, बाभूळसर बुद्रुक, मांडवगण फराटा, सादलगाव आदी गावात ही कटके यांचे स्वागत केले जात होते.सर्वत्र महिला व युवक यांची उपस्थिती लक्षणीय होती.राञी साडेअकरा वाजता प्रचंड थंडी असुनही अनेक महिला केवळ माउली आबांनाच पाहायचे यासाठी थांबुन होत्या.तर सेल्फीसाठी मोठी गर्दी सभास्थळी होत असल्याचे चिञ दिसुन येते.यानिमित्ताने गावभेट दौ-यात सर्वत्र माऊलीमय वातावरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
याबाबत बोलताना माउली कटके यांनी सांगितले कि,शिरूर हवेलीत नागरिकांचे जे प्रेम,स्वागत मला मिळत आहे ते अभूतपूर्व आहे.जनतेने मला यावेळी संधी दिली तर,आपल्या भागातील जे जे प्रश्न असतील ते सोडविण्यावर भर दिला जाईल.चासकमान पाणी,असेल इतर शेतीच्या पाण्याच्या समस्या असतील त्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल.शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा घोडगंगा साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील.नागरिकांना भयमुक्त व आपुलकीने वागणूक देण्यासाठी मी बांधील राहील असे आश्वासन महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांनी दिले.
प्रदिप कंद यांनी बोलताना सांगितले कि,महायुतीच्या माध्यमातुन अनेक कल्याणकारी योजना सुरु करण्यात आला,त्याचा लाभ तळागाळातील सर्वसामान्यांना होत आहे.यामध्ये महिलांसाठी लाडकी बहिण योजना,शेतक-यांसाठी लाइट बिल माफ आदी योजना सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यसाठी फायदेशीर ठरत आहे.त्यामुळे यावेळी जनता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही असे कंद यांनी सांगितले.
या गावभेट दौ-यात अण्णासाहेब महाडिक,सुधीर फराटे इनामदार,दादा पाटील फराटे, राहुल पाचर्णे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी बापू काळे, भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, महेश बापू ढमढेरे, दूध संघाचे संचालक स्वप्निल ढमढेरे, स्वप्निल गायकवाड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, रयत क्रांतीचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब फराटे, बाजार समितीचे संचालक विजेंद्र गद्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब कोळपे,चाचा जाधवराव,रामभाऊ कदम, तज्ञिका कर्डिले, श्रुतिका झांबरे, तृप्ती सरोदे, बाबासाहेब फराटे, आबासाहेब सरोदे,आत्माराम फराटे, एकनाथ शेलार, अविनाश पवार,जिल्हा माजी सदस्य राजेंद्र जगदाळे, राजेंद्र कोरेकर सरपंच समीक्षा फराटे पाटील,गोविंद फराटे,प्रभाकर घाडगे,दिंगबर फराटे,आत्माराम फराटे,सुजित शेलार, गणपत फराटे, संतोष फराटे पाटील,आदी उपस्थित होते.