मांडवगण फराटा(राजेंद्र बहिरट) : दहावीनंतर दुरावलेले मिञ तब्बल २४ वर्षानंतर एकञ आल्याचा दुर्मिळ योगायोग तांदळी येथे नुकताच जुळुन आला होता.निमित्त होते स्नेह मेळाव्याचे…!
पांडुरंग विद्यालय तांदळी येथील एस.एस.सी.बॅच 1999-2000 चे गेट टु टुगेदर तब्बल चोवीस वर्षिनंतर उत्साहात संपन्न झाले. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त करतांना आपल्या जीवनातील अनेक चांगले -वाईट अनुभव सांगितले. प्रत्येकालाच दहावी झाल्यानंतर जीवनात स्थैर्य प्राप्त करण्यासाठी संघर्ष करावा लागला. आता सर्वच एका टप्प्यावर येऊन चांगले स्थिरावलेले आहेत कोण पोलिस अधिकारी झालेत तर कोण छान पैकी बिझनेस सांभाळत आहेत. कोण ऊत्तम प्रकारे शेती सांभाळत आहेत.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.२४ वर्षानंतर जमल्यानंतर प्रत्येकजण आठवणीत भारावुन गेला होता.काही क्षणापुरते का होईना पुन्हा शाळेत गेल्यासारखे प्रत्येकाला वाटत होते. प्रत्येकाने जाता-जाता येथुन पुढे कायम एकमेकांच्या संपर्कात राहुन प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊ असं एकमेकांना आश्वासन देत एकमेकांचा निरोप घेतला.हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी ज्ञानदेव गदादे, योगेश गदादे,फत्तेसिंग गदादे,विजय गदादे,प्रशांत कळसकर,बाळु गदादे,मयुर गदादे यांनी प्रयत्न केले.सुत्रसंचलन मनोहर गदादे सुनील कळसकर यांनी केले तर आभार अंकुश ढमढेरे यांनी मानले.