शिरुर (प्रतिनीधी) : शिरुर हवेली विधानसभा निवडणुकित उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी उपमुख्यमंञी अजित पवार यांनी थेट उमेदवारांशी सकारात्मक चर्चा केल्याने शिरुर हवेलीत महायुतीच्या उमेदवारांना नाराजांची समजुत काढण्यात यश आले.त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीची सरळ सरळ लढत होत आहे.
शिरुर हवेलीची निवडणुक प्रक्रिया सुरु असुन राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार व देवेंद्र फडवणीस यांची या निवडणुकित मोठी भुमिका राहिली आहे.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद हे अपक्ष उमेदवार म्हणुन उभे होते.उपमुख्यमंञी देवेंद्र फडवणीस यांनी कंद यांच्याशी थेट चर्चा केल्याने कंद यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला .त्याचदिवशी दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते संजय पाचंगे यांचाही अपक्ष म्हणुन उमेदवारी अर्ज होता.यावेळी संजय पाचंगे यांचे सह शिरूर तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांशी पालकमंत्री अजित पवार यांनी फोनवर संवाद साधला. त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. कारखाना सुरू करण्यासंदर्भात सगळ्यांनी एकमुखी मागणी केली असता,पवारांनी सांगितले की पुढील सरकार महायुतीचच येतेय.त्यामुळे राज्यस्तरावरुन प्रयत्न करून कारखाना तर आपण चालू करूच, मात्र कितीही प्रयत्न केले तरी हा हंगाम आपल्याला पकडता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात यावर्षीची ऊस तोडी बाबत चिंता असेल तर आपण आंबेगाव, श्रीगोंदा, दौंड मधील साखर कारखान्यांना सक्त सूचना देऊन यावर्षी शिरूर तालुक्यातील एकाही शेतकऱ्याला मनस्ताप व अडवणूक सहन करायला लागणार नाही याबाबत नियोजन करू असे सांगितले.
दरम्यान कारखाना सुरू करण्याची मागणी केली असताना पवार यांनी स्वतःहून यावर्षीच्या नियोजनाबाबत महायुतीच्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या.राजकारण म्हणून आपल्या चुका झाकण्यासाठी दुसरीकडे शिंतोडे उडवून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रकार अशोक पवार यांनी चालवला आहे. मात्र त्यांच्या या खेळात एका चांगल्या कारखान्याचे नुकसान झाले आहे आणि शिरूर मधील शेतकरी हवालदिल झालेला आहे.येणारे सरकार हे महायुतीचेच असेल असे आता वेगवेगळ्या सर्वे सोबतच विरोधी पक्ष सुद्धा बोलत आहेत. त्यामुळे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी तर एका बाजूला सुरू राहीलच मात्र उच्चस्तरीय पातळीवर निर्णय घेऊन हा कारखाना ताबडतोब सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार जातीने लक्ष घालेल अशी निसंदीग्ध ग्वाही पालकमंत्री अजित पवार यांनी बोलताना दिली.घोडगंगा कारखाना सुरू केला जाईल व कारखान्याचे खाजगीकरण करून दिले जाणार नाही असा स्पष्ट शब्द मला अजित दादा यांच्याकडून पाहिजे होता. माघारीच्या दिवशी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत असताना अजितदादा पवार यांचा फोन आला व त्यांनी त्या संदर्भात त्यांनी निसंधीग्ध शब्दात सांगितले की कारखाना आपणच सुरू करू आणि कोणत्याही परिस्थितीत त्याचे खाजगीकरण करून दिले जाणार नाही.पालकमंत्री महोदयांकडून मला स्पष्ट शब्दात आश्वासन मिळाल्याने मी या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे संजय पाचंगे यांनी सांगितले.