शिरुर(प्रतिनीधी) : शिरुर हवेली विधानसभा उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी अपक्ष उमेदवार प्रदिप कंद यांसह अनेक मातब्बर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचे दोन्ही उमेदवार समोरासमोर आल्याने शिरुर हवेलीची निवडणुक चुरशीची होणार आहे.
शिरुर हवेलीची निवडणुक प्रक्रिया सध्या सुरु असुन महाविकास आघाडीकडुन अशोक पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर महायुतीकडुन ज्ञानेश्वर कटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.अपक्ष म्हणुन जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांसह अनेक मातब्बर उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.शिरुर हवेलीत दुरंगी कि तिरंगी लढत होणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता होती.प्रदिप कंद यांची शिरुर शहर,तालुका व हवेली भागात नागरिकांशी थेट संबंध असल्याने मोठा जनसंपर्क होता.ते या निवडणुकित लढण्यास इच्छुक होते माञ अखेर राज्याचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडवणीस यांनी कंद यांच्याशी संवाद साधल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करुन कंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.याचबरोबर अनेक मातब्बर उमेदवारांनीही या निवडणुकित माघार घेतल्याने महाविकास आघाडीचे अशोक पवार विरुद्ध महायुतीचे ज्ञानेश्वर कटके अशी समोरासमोर थेट लढत होणार आहे.दरम्यान शिरुर हवेली विधानसभा निवडणुकित अर्ज माघार घेण्याच्या दिवशी प्रदीप कंद,शांताराम कटके,जगदीश पाचर्णे,भाऊसाहेब जाधव,शिवाजी कुऱ्हाडे,सुजाता पवार, मनीषा कटके,शिवाजी कदम,प्रकाश जमदाडे, सुरेश वाळके, पंढरीनाथ गोरडे, गणेश दाभाडे, संजय पाचंगे, मारुती वाघचौरे या उमेदवारांनी अर्ज माघार घेतले.
या निवडणुकित दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने ही लढत चुरशीची होणार असल्याची चर्चा राजकिय जाणकारांमध्ये सुरु होती.