मांडवगण फराटा(प्रतिनीधी) : घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडल्याने अनेकांचे नुकसान होत आहे.घोडगंगा किसान क्रांती ही शेतक-यांच्या हितासाठी पायी दौरा करत असुन आम्ही कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांच्याशी समोरासमोर चर्चेस तयार असुन वडगाव रासाई येथे मु्क्कामी पायी दौर्यावेळी सत्ताधार्यांनी समोरासमोर येण्याचे खुले आव्हान घोडगंगा किसान क्रांतीच्या वतीने माजी संचालक सुधीर फराटे इनामदार यांनी केले आहे.
मांडवगण फराटा(ता.शिरुर) येथे घोडगंगा किसान क्रांतीच्यावतीने पञकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सुधीर फराटे हे बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले कि,शिरुर तालुक्यातील महत्वाचा घोडगंगा सहकारी साखर कारखाना सध्या बंद आहे.तालुक्यात सर्वञ शेतकरी घोडगंगा कारखाना सुरु होणार का अशा विविध बाबींवर संभ्रमात आहे.नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेतही याबाबत ठोस चर्चा झालेली नाही.उपमुख्यमंञी अजित पवार यांच्यावर आरोप केले जात आहे माञ, वस्तुस्थिती वेगळी आहे.घोडगंगा कारखाना आजही ६४ कोटींनी तोटयात आहे.सन २०१० साली कारखान्यास ५ हजार मे.टन विस्तारवाढीसाठी परवानगी मिळाली व कर्जही मिळाले होते.कारखान्याने कोजन विस्तार करताना प्रतिवर्षी १०० कोटींची विज तयार करणार असे सांगितले होते माञ प्रत्यक्षात पाच वर्षात ७५ कोटींची वीज निर्मिती केली.महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेची जप्तीची नोटीस व ८३ कोटी ३७ लाखांची वसुली नोटीस आजी माजी संचालकांना आली आहे.
घोडगंगा साखर कारखान्याचा एनसीडीसीला प्रस्ताव सादर केला होता परंतु बॅंकांची एनओसी न घेतल्यामुळे व कारखाना कामगारांची कामावर उपस्थिती नसल्याने कारखाना चालु होउ शकत नाही.म्हणुन शासनाने दि.०८.०४.२०२४ रोजी घोडगंगेचा हा प्रस्ताव फेटाळला.घोडगंगा कारखान्याला शासनाकडुन १०७ कोटी मिळणार आहेत परंतु ते पैसे हे मागील देणी देण्यासाठीच असुन कारखाना चालु करण्यासाठी कोणतीही तरतुद नाही.कारखान्याला जे कर्ज मिळणार आहे त्यासाठी शासनाकडुन अनेक अटी असुन जे कर्ज मिळेल त्या कर्जाची थकबाकी निर्माण झाल्यास १ महिन्याच्या आत संचालक मंडळ बरखास्त करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येइल व त्याचबरोबर शासकिय प्रशासकिय मंडळ नियुक्त करण्यात येइल अशी अट घालण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे यांनी सांगितले कि,कारखान्याने व्यवस्थापन करत असताना अशोक पवारांच्या हेकेखोरपणामुळे कोजन प्रकल्प उभा केला.त्यावेळी अभ्यासु असुनही तांञिकबाबी पाहिल्या नाही परिणामी आज शेतक-यांचा घोडगंगा बंद पडला असल्याचा आरोप त्यांनी केला.यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रवीबापु काळे,लक्ष्मणबापु फराटे,अंकुश शितोळे,बिभिषन फराटे आदी उपस्थित होते.