शिरूर(विशेष प्रतिनीधी) : मध्यप्रदेश वरुन विक्रीसाठी पिस्तुल आणणा-या दोन आरोपींना शिरूर पोलिसांनी मोठ्या शिताफिने अटक करत पाच पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
अनिकेत विलास गव्हाणे (वय.२०, राहणार गव्हाणेवाडी, तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर) व मंगेश दादाभाऊ खुपटे(वय.२०, रा. जवळा, तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे नगर हायवे लगत नाना स्पॉट हॉटेल जवळ दोन व्यक्ती संशयास्पद थांबले असून त्यांच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शिरूर पोलीस स्टेशनच्या पथकाने सापळा रचून वरील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी अंगझडती घेतली असता दोन्ही आरोपींपैकी अनिकेत याच्या कमरेला दोन गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे,तसेच मंगेश खुपटे याच्या कमरेला तीन गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असे एकूण पाच गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे पोलिसांनी आरोपींकडून जप्त केले आहेत.
याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींनी हे पिस्तूल मध्य प्रदेश येथून आणले असल्याचे पोलिसांना तपासात सांगितले.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गिरी, पोलीस अंमलदार नाथ साहेब जगताप, विनोद मोरे, विजय शिंदे परशुराम सांगळे, निखिल रावडे, रघुनाथ हळनोर, नितेश थोरात, सचिन भोई यांच्या पथकाने केली आहे.